
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने ’डिजी लॉकर’ सुविधा सुरु केली आहे. याअंतर्गत प्रवाशांना रेल्वे स्थानकात त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था असेल. सध्या रत्नागिरीमध्ये ही सुविधा उपलब्ध केली असून लवकरच सिंधुदूर्ग जिह्यातील कणकवली आणि कुडाळ या स्थानकांमध्ये ’डिजी लॉकर’ सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. प्रवाशांना 24 तास सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
‘डिजी लॉकर’ ही स्वयंचलित आणि डिजीटल पद्धतीने चालवण्यात येणारी सामान साठवणूक व्यवस्था आहे. प्रवासी यूपीआय, व्रेडिट किंवा डेबिट कार्डसारख्या क्यूआर कोड आधारित डिजीटल पेमेंट पद्धतीचा वापर करुन सुविधेचे शुल्क देऊ शकणार आहेत. ही सुविधा पूर्णपणे पॅशलेस असून पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, थिवीम आणि उडुपी या रेल्वे स्थानकांवर ‘डिजी लॉकर’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली.




























































