बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे याकरिता एका डिजिटल चेकअप बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. ओम गगनगिरी हॉस्पिटल व ऑक्युपेशनल हेल्थ सर्विसेस सर्विसेस कोपरखैरणे यांची हिंदुथानातील ही तिसरी डिजिटल हेल्थ चेकअप बस आहे.
डिजिटल बस महाराष्ट्रातील असंघटित कामगार माथाडी कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच एसटी महामंडळातील कामगार यांच्या आरोग्य तपासणीसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी, बहिरेपणाची तपासणी फुफुसाची तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणे असून कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहे.































































