राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनीमधील कामगार व इतर क्षेत्रांतील संघटित व असंघटित कामगार यांच्याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. याकरिता एका डिजिटल चेकअप बस तयार करण्यात आली आहे. या बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

या बसमध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी, बहिरेपणाची तपासणी फुप्फुसाची तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या करणारी उपकरणे असून कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तपासणी करणार आहे.

ओम गगनगिरी हॉस्पिटल व ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिसेस, कोपरखैरणे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली हिंदुस्थानातील ही  तिसरी डिजिटल हेल्थ चेकअप बस आहे. सदर डिजिटल बस महाराष्ट्रातील असंघटित कामगार, माथाडी कामगार, इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच एसटी महामंडळातील कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात फिरणार आहे. यावेळी परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, आमदार, मुख्यमंत्री सचिवालयातील समन्वयक रवींद्र वायकर, ज्ञानराज चौघुले आदी उपस्थित होते.