निर्माता, दिग्दर्शक मांजरेकर यांना खंडणीची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिने निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे 35 कोटींची खंडणी मागून न दिल्यास ठार मारण्याची देण्यात आली होती. गजाआड असलेला गँगस्टर अबू सालेमच्या नावाने ही खंडणी मागण्यात आली होती. पण मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तत्काळ तपासचक्र फिरवून खंडणी मागणाऱया तरुणाला खेडमध्ये पकडले.

महेश मांजरेकर यांच्या मोबाईलवर खंडणीचा मेसेज आला होता. अबू सालेमच्या नावाने 35 कोटीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी मांजरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पुढील तपासाकरिता मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांची दोन पथके तयार करून ती कल्याण व खेड येथे पाठवली होती. अखेर खेड येथून मिलिंद तुलसरणकर या 34 वर्षीय आरोपीला पकडण्यात आले. मिलिंद चहाचा व्यवसाय करायचा. लॉकडाऊनमध्ये काहीच काम नसल्याने खंडणी मागून झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे कळते.