दीपिका पदुकोणवर दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी भडकला, चित्रपटाची कथा लीक केल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही चित्रपटसृष्टीतील अशी एक नाव आहे जी वादापासून दूर राहणे पसंत करते. मात्र  आता दीपिकाचे एका नव्या वादाशी जोडलेले आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटाबाबत दीपिका-प्रभास आणि तृप्ती दिमरी यांची नावे बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत.

दीपिका पदुकोणला दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने चित्रपटातून काढल्यानंतर, चित्रपटाशी संबंधित माहिती लीक होऊ लागली. आता संदीप रेड्डी वांगा यांनी यासाठी दीपिका आणि तिच्या पीआरला जबाबदार धरले आहे. कोणाचेही नाव न घेता, संदीप रेड्डी वांगा यांनी एक ट्विट केले आहे हे ट्विट सध्या खूप वेगाने व्हायरल होत आहे.

ट्विटमध्ये दीपिकाचे नाव न घेता त्यांनी लिहिले की, अभिनेता आणि चित्रपट निर्मात्यामध्ये एक अघोषित करार असतो की, यामध्ये चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती लीक करत नाहीत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बातमी आली होती की दीपिका पदुकोण आता प्रभासच्या ‘स्पिरीट’ चित्रपटाचा भाग राहणार नाही. चित्रपट निर्माते दीपिकाच्या मागण्यांबद्दल समाधानी नाहीत. ती फक्त 8 तास काम करण्यावर ठाम होती. तसेच तेलुगू संवाद बोलणार नाही, जास्त मानधनाची मागणी, तसेच नफ्यात वाटा घेणार अशा मागण्या दीपिकाकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिग्दर्शकाने दीपिकासोबत काम करण्यास नकार दिला.

 

संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटातून दीपिका पदुकोनला डच्चू, अव्यावसायिक मागण्यांमुळे दिग्दर्शक झालेला त्रस्त

दीपिकाला चित्रपटातून काढल्यानंतर, चित्रपटाविषयीच्या बातम्या एकामागून एक बाहेर येत राहिल्या. यामुळे दिग्दर्शकांनी दीपिका पदुकोणला त्यांच्या स्टाइलने फटकारले. नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट संदीप रेड्डी वांगा यांनी कोणाचेही नाव न घेता लिहिले आहे की, पुढच्या वेळी संपूर्ण कहाणी सांगा. कारण या गोष्टी मला अजिबात महत्त्वाच्या नाहीत. संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” मी एखादी कथा अभिनेत्याला सांगतो तेव्हा आमच्यात विश्वासार्हता असते. आमच्यात एक न बोललेला एनडीए (नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट) आहे. पण हा करार तोडून तसेच तुमच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रींना कमी लेखून आणि माझी कहाणी उघड करता, हाच तुमचा स्वभाव आहे का? एक चित्रपट निर्माता म्हणून, मी वर्षानुवर्षे माझ्या कलाकृतीवर कठोर परिश्रम केले आहेत आणि माझ्यासाठी चित्रपट निर्मिती हेच सर्वस्व आहे. अर्थात केलेल्या या कृत्याचा मला अजिबात फरक पडत नाही. हे सर्व बघून मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते, खुंदक में बिल्ली खंबा नोचे..