आगाऊ आरक्षण करणाऱ्या एसटी प्रवाशांना सवलत

आगाऊ आरक्षण करणाऱ्या एसटी प्रवाशांना आता तिकीट दरात सवलत मिळणार आहे. कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सवलत देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई-शिवनेरीसारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.

दरम्यान, बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि सेवा जेष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात. तसेच मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबवा या उद्देशाने एसटीच्या सर्व बदल्या या ऑनलाइन पद्धतीने करण्याचीही घोषणा मंत्री सरनाईक यांना केली होती. त्या योजनेचे अनावरण त्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. आंतर प्रादेशिक, प्रदेशांतर्गत व विभागांतर्गत होणाऱ्या सर्व बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.