डिस्कव्हरी प्लससाठी येतंय माहितीचा खजिना

1601

देशातील सर्वात विश्वासार्ह व आघाडीचे रिअल- लाईफ मनोरंजन नेटवर्क असलेल्या डिस्कक्हरीने ‘डिस्कक्हरी प्लस’ या नवीन डीटूसी स्ट्रीमिंग अॅपचा शुभारंभ केला आहे. या ऍपमुळे मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. दरवर्षी रुपये 299 या सुरुवातीच्या स्पर्धात्मक ऑफर दरासह उपलब्ध होणारे हे अॅप हिंदुस्थानासाठी खास प्रकारे विकसित करण्यात आले आहे. याद्वारे अडीच कोटी ग्राहकांना लक्ष्य करण्यात आले आहे. गुगल पेद्वारे डिस्कव्हरी प्लस अतिशय कैशिष्टय़पूर्ण असे रिकार्डसही देणार आहे. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजता ‘इंटू द वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या रजनीकांत यांच्या सोबतच्या शोच्या पहिल्या भागाला डिस्कव्हरीवर टय़ुन इन करणाऱया गुगल पे युजरला वार्षिक सबक्रिप्शन 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकेल. या ओटीटी सेवेत हजारो तासांचे कंटेंट, विज्ञान, साहस, खाद्य, जीवनशैली आदी 40 प्रकार हिंदी, इंग्लिश, मराठी, तामीळ, तेलगू, मल्याळम, कन्नडा, बंगाली अशा आठ भाषांमध्ये सादर होतील.

आपली प्रतिक्रिया द्या