राज्यसभा निवडणुकीवर चर्चा.. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलले. शरद पवार यांनी राज्यसभेवर जावे, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि आग्रह आहे. त्यामुळे याबाबत आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केली. त्यावर महाविकास आघाडीचा निर्णय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष मिळून घेऊ, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला आम्ही आधीच विनंती केलेली आहे. यावर उद्यापर्यंत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाले.

चर्चा झाली, पण अद्याप निर्णय नाहीआदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या भेटीनंतरएक्सवर पोस्ट केली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, पण राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. लवकरच हा निर्णय घेतला जाईल. चर्चेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येतील, असे त्यांनी नमूद केले.