परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आपले कर्ज माफ झाले आहे, तुमचा सातबारा कोरा झाला आहे, असे पत्र कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱयांना पाठवा, असे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱयांच्या बैठकीत पीक कर्ज आािण सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीचा आढवा त्यांनी यावेळी घेतला.