कराडमध्ये पेट्रोलपंपासमोरील दुभाजक हटवले; नागरिकांची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराडमधील भेदा चौक-कोल्हापूर नाका येथील पोपटभाई पेट्रोलपंपासमोरील दुभाजक हटवण्यात आले आहे, दुभाजक हटवून पेट्रोलपंपाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सोय व्हावी हा हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दुभाजक हटवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत  आपल्याला माहिती नसल्याचे  नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच दुभाजक हटवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता झाली नसल्नायाचे स्पष्ट होत आहे.

भेदा चौक-कोल्हापूर नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाचे सुशोभीकरणांतर्गत नगरपालिकेने दुभाजक उभारले होते. या दुभाजकांवर घनदाट झाडी आहेत तर या दुभजक मार्गमुळे बस सेवा देखील सुरळीत चालते कारण इदगाह बसस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या बस याच दुभाजक मार्गाने ये-जा करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या दुभाजक मार्गामुळे वहतुक कोंडी होत नव्हती. हा दुभाजक हटवल्यामुळे वाहतुक कोंडी होत आहे, मात्र, दुभाजक हटवल्याने पेट्रोलपंपाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सोय झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून पेट्रोलपंप मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याबाबत  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती सौरभ पाटील लोकशाही आघाडीचे गटनेते यांनी दिली.