मनतरंग – जरा ठहरो!

दिव्या नेरुरकर-सौदागर << [email protected] >>

नताशाला वैचारिक गैरसमजातून बाहेर काढणं गरजेचं होतं. कारण तिच्या वैवाहिक आयुष्यावर याचा परिणाम होत होता. तिच्या नवऱ्यालाही याच कल्पना देण्यात आली आणि त्यालाही या प्रक्रियेत सामील करण्यात आले. तिला ‘अतिविचारांवर नियंत्रण’ ठेवण्यासाठी काही पध्दत सुचवण्यात आल्या.

‘‘मॅम, मला आजच्या आज तुमच अपॉइंटमेंट हवी आहे. कुठचीही वेळ सांगा. मी येईन’’… नताशाच्या (नाव बदलले आहे) आवाजात आर्जव होतं. ‘‘मला खूप त्रास होतोय. सहन करण्यापलिकडे आहे. मी आताही येऊ शकते…’’ तिच कळकळ तिला होत असलेल्या त्रासाच जाणीव करून देत होती.

ठरल्या वेळेला नताशा क्लिनिकमध्ये हजर झाली.
‘‘मॅम, हल्ली एक महिन्यापासून माझं विचार करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. हे इतकं वाढलंय की, त्यामुळे मी रात्रच शांत झोपूही शकत नाही. सकाळी उठल्यावरसुध्दा काही वेळात विचारांची ट्रेन जी चालू होते ती रात्रपर्यंत. या विचारांमुळे मी अस्वस्थ झालेय खरी…’’ …नताशाने आता तिच समस्या स्पष्ट मांडायला सुरुवात केली.

तिच्या म्हणण्यानुसार तिला विचार करण्याची सवय ही लहानपणापासून होत. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तिच्या मनात घर करून राहायची आणि त्या गोष्टीचा मनात काथ्याकूट केल्याशिवाय तिला चैन पडत नसे.  नताशा  तिशीतील विवाहिता. संसारही चारचौघांसारखा चालला होता तिचा. ‘‘पण, मग इतके विचार का?’’ या प्रश्नावर त पटकन उत्तरली, ‘‘माझा स्वभाव म्हणू शकता’’

‘‘स्वभाव का बनला असेल तुझा?’’ या माझ्या प्रश्नावर नताशा एकदम चपापली. तिच्या बोटांनी संथ लयीत टेबलावर ताल धरलेला होताच…‘‘मी आई-बाबांच एकुलती एक. दोघंही नोकरी करायचे. त्यामुळे त्यांचा सहवास तसा कमीच. दोघंही तसे कमी बोलणारे आणि त्यात माझ्या वडिलांना विचारमग्न राहायची सवय होती. त्यांचा पगडा असावा माझ्यावर..’’ असं ती म्हणाल.

‘‘पण त्यांना त्यांच्या अशा विचार करण्याच्या सवयीचा कधी त्रास होत होता का?’’ असं विचारताच नताशा एकदम स्तब्ध झाली आणि तिने नकारार्थी मान हलवली. ‘‘मग मॅम, त्यांच्या आणि माझ्या विचार करण्याच्या सवयमध्ये फरक तो काय?’’ असं तिने विचारलं आणि तिच्या समुपदेशनास सुरुवात झाली. नताशाला ‘अतिविचार’ ही समस्या होत. यामध्ये व्यक्ती बऱ्याचदा

भूतकाळ आणि भविष्यकाळाचा नको तितका विचार करत असते. या व्यक्तीला येणारे विचार हे एकत्र आणि गुंतागुंतचे असतात.

हे विचार इतके तीव्र असतात की, कधी कधी प्राप्त परिस्थितपेक्षा खरे वाटतात आणि व्यक्ती त्याच विचारांवर ठाम राहायला सुरुवात करते.

मग पुढे पुढे ही व्यक्ती तिच्या आजूबाजूस असणाऱ्या इतर व्यक्ती तसेच असलेल्या परिस्थितला आपल्याच विचारांच्या मापदंडातून बघायला सुरुवात करते.

हे विचार त्या व्यक्तीला मनस्ताप देत असतात. कारण ते एकदा सुरू झाले की, तिची पाठ सोडत नाहीत.

अशा वेळेस त्या व्यक्तीला झोप न लागणे, भूक न लागणे किंवा जास्त लागणे, डोकेदुखी, छातीत धडधड (विचारांचा प्रभाव जास्त असल्यास) अशा प्रकारच्या शारीरिक तसेच अकारण व अनाठायी भीती, दडपण, चिडचिड, ताण आणि (वैचारिक गोंधळ सहापेक्षा जास्त महिने राहिल्यास) नैराश्य येऊ शकते.

याचा परिणाम या व्यक्तीच्या स्व-प्रतिमेवर होतोच, शिवाय तिच्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधांवरही होतो.   अश व्यक्ती मग एकटं राहायला सुरुवात करते.

याउलट विचारी असणाऱ्या व्यक्ती या सारासार विवेकबुद्धीला अनुसरून वागतात. त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम होत नाही किंवा त्यांच्या प्रतिमेवरही होत नाही. नताशाला तिच्या आणि तिच्या वडिलांच्या विचार करण्याच्या पद्धतीतील फरक लक्षात येत होता.

तिने काही दिवस स्वतःच्या विचारांच्या पद्धतीवर लक्ष ठेवले. त्यात तिला असे लक्षात आले की, साधारण दुपारच्या वेळेस तिला विचार जास्त येत असत. कारण त तेव्हा मोकळी असे. त्यावेळी तिला एकटेपण जाणवे आणि ‘नवऱ्याला माझ्यासाठी वेळच नाही..’ अशा प्रकारे विचार करत ती नकारात्मकतेकडे जात असे. नताशाला वैचारिक गैरसमजातून बाहेर काढणं गरजेचं होतं. कारण तिच्या वैवाहिक आयुष्यावर याचा परिणाम होत होता. तिला ‘अतिविचारांवर नियंत्रण’ ठेवण्यासाठी काही पध्दत सुचवण्यात आल्या.

काही ना काही कामामध्ये गुंतून राहणे.

मनातील विचार लिहून काढणे.

ध्यान आणि योगाभ्यास करणे.

जास्तीत जास्त बोलणे, ज्यामुळे गैरसमज कम होऊन नात्यांमधील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

नताशा स्वतःवर निःसंशय प्रामाणिकपणे काम करत होती आणि तिचा नवराही तिला शक्य होईल तितकी तिला ‘अतिविचारांतून बाहेर काढण्यासाठी’ मदत करत होता. आता नताशाने नवीन नोकरी शोधली आहे आणि आता ती नोकरीत इतकी बिझी झाली आहे की, तिला विचार करण्याचही फुरसत नाही.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)