यंदा दिवाळी तीनच दिवस

1430

यावर्षी दिवाळी नेहमीप्रमाणे चार दिवसांची नसून नरक-चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन 27 ऑक्टोबरला एकाच दिवशी, 28 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि मंगळवारी 29 ऑक्टोबर भाऊबीज अशी तीन दिवसांचीच आहे, असे शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पं.वसंतराव गाडगीळ यानी पत्रकाद्वारे ळविले आहे.

दिवाळीच्या नरक चतुर्दशीचे दिवाळीचे पहिले पहाटेचे अभ्यंगस्नान ब्रम्हमुहूर्त पहाटे 4.30 ते 5.30 या मुहूर्तावर रविवार पहाटेच करणे सर्वोत्तम. याच दिवशी दुपारी 12.13 वाजता दर्श अमावस्या सुरू होत असल्याने लक्ष्मीपूजन रविवारीच संध्याकाळी 6.06 मिनिटांपासून 8.37 मिनिटांपर्यंत करावी असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या