हे जोक वाचाल तर पोट धरून गडाबडा लोळाल!

608

सामना ऑनलाईन। मुंबई

बायको: माझी एक अट आहे!

नवरा : काय?

बायको: तुम्ही या दिवाऴीत सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार.

नवरा: माझी पण एक अट आहे?

बायको: काय?

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

…………………………………………
दिवाळीत घरीच दिवे लावायला मिळतात
हे किती चांगले आहे ना!

…………………………………….

लाडू नीट झाले नाहीत तर
फराळाचा चिवडा होतो

……………………………………
बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला दिवाळीसाठी रॉकेट गिफ्ट दिले.

गर्लफ्रेड..हा काय बावळटपणा आहे.

बॉयफ्रेंड…तूला चंद्र आणि तारे हवेत ना. मग यावर बसायचं आणि सुटायचं.

……………………………………………………………….
लग्नाच्या आधी दिवाळीची शॉपिंग
जीन्स
शर्ट्स
परफ्युम
शूज
बेल्ट
इत्यादी….

लग्नानंतरची दिवाळीची शॉपिंग…..
बेसन २ किलो
मैदा २ किलो
शेंगदाणे १ किलो
रवा १ किलो
तूप ५ किलो
तेल २ किलो
सुके खोबरे १ किलो
साखर ४ किलो
इत्यादी इत्यादी

…………………………………………………………

लहानपणी टिकलीची बंदूकच पाहिजे म्हणून घरच्यांकडे हट्ट धरायचो…

शेवटी वैतागून मोठा झाल्यावर घरच्यांनी टिकली लावणारी बंदूकच आणून दिली…

आता वाजतेय रोज दिवाळीसारखी.

……………………………………………………………..
आज पेपर मध्ये दिवाळी सेलची जाहिरात होती…

एक साडी घ्या व 50% वाचवा

मी पेपरच फाडला व 100%वाचवले

………………………………………………………

पुणेरी पाटी…

कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात.
उगीच लांबड लावू नये.

अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये.
सरळ मुद्यावर यावे.

फटाके न उडविण्याविषयी प्रबोधन करू नये.

दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये.
आम्हाला माहीत आहे.

मुकेश अंबानींच्या घरील दिवाळीचे फोटो टाकू नका.
आम्हाला कौतूक नाही.

सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका.
आम्ही तो वेगळा करतो.

मागील वर्षीच्या पोस्ट चालणार नाहीत….

हुकुमावरून…!

……………………………..

आपली प्रतिक्रिया द्या