पूजा चव्हाण

दिवाळीला सुरुवात झाली असून घरोघरी महिलांची दिवाळ फराळाची लगबग सुरू आहे. पण जर यावेळी तुम्हांला पारंपारिक फराळाबरोबरच दुसरी डिश बनवण्याची इच्छा असेल तर आम्ही आणलेल्या या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील.

नेवरी- ऐकायला आणि वाचायला जरी या पदार्थाचे नाव वेगळे वाटत असले तरी हा पदार्थ तुमच्या चांगलाच परिचयाचा आहे. प्रामुख्याने कोकण आणि गोव्यात हा पदार्थ दिवाळीत बनवला जातो. दिसायला करंजी सारखाच आणि चवीलाही थोड्याफार फरकाने कंरजीसारखाच लागतो.

goan-nevri-image-ps

यासाठी सर्व प्रथम तादंळाचे पीठ (करंजीच्या पीठा सारखे) घट्ट मळून घ्यावे. नेवऱ्याच्या सारणासाठी एक ओला नारळ किसून घ्यावा. कढईत गुळ,नारळ,वेलची एकत्र भाजून घ्यावेत. त्यानंतर करंजीच्या पीठाच्या लहान लहान पुऱ्या लाटून त्यात हे सारण भरावे. त्याला कंरजीचा आकार द्यावा. आणि गरम तेलात तळून काढावेत.

मोहनथाल- 2 कप बेसनामध्ये 3 चमचे तूप आणि ३चमच दुध मिक्स करुन, चाळून घ्यावेत. कढईमध्ये 1 कप तूप गरम करुन घेणे, त्यामध्ये बेसन टाकून मंद आचेवर भाजून घ्यावेत. त्यानंतर  1 कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून त्याचा पाक बनवून घेणे. बेसन मध्ये पाक टाकून 5 मिनिट ते थंड करावेत. त्यानंतर एका भांड्यात काढून त्याच्या चौकोनी वड्या कापाव्यात.

mahanthal2

नारळाची बर्फी- 3 कप किसलेला ओला नारळ मिक्सर लावून वाटून घ्यावा. नंतर 2 कप साखर, अर्धा कप दुध टाकून हे नारळ भाजून घ्यावेत. (हवी असल्यास मलाई टाकावी). नीट भाजुन घेतल्यावर एका भांड्यात काढून त्याला चौकोनी आकाराने कापावेत.

coconut-burfi

दुध बर्फी- सर्व प्रथम 1/4 कप तूप गरम करुन त्यात 3/4 कप दुध, अर्धा कप साखर आणि अडीच कप दुध पावडर टाकून 10 मिनिट भाजावेत.एका भांड्यात काढून त्याला चौकोनी आकाराने कापावेत.

milk-burfi-3

 गव्हाच्या पीठाची बर्फी- सर्व प्रथम अर्धा कप तूप गरम करुन त्यात 1 कप कणीक टाकुन मंद आचेवर 10 मिनिट भाजावेत. त्यात वेलची पावडर आणि अर्धा कप गुळ टाकावेत. एका भांड्यात काढून त्याला चौकोनी आकाराने कापावेत.

aata-burfi

नाचणीची बर्फी– 2 चमचे तूप व अर्धा कप नाचणीचे पीठ मंद आचेवर 3,4 मिनिट भाजावेत. त्यात गुळ व वेलची पावडर ,बदाम पावडर व दुध घालून भाजावे. अॅल्युमिनियमच्या भांड्यात काढून त्याला चौकोनी आकाराने कापावेत.

nachi-burfi-2

आपली प्रतिक्रिया द्या