
सामना ऑनलाईन | लंडन
सर्बीयाच्या नोवाक जोकोविच याने रविवारी टेनिसकोर्टवर जबरदस्त कामगिरी करीत दक्षिण आप्रिâकेच्या केव्हीन अॅण्डरसनला ६-२, ६-२, ७-६ अशा फरकाने पराभूत करीत चौथ्यांदा विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा मान संपादन केला. हे त्याचे १३वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद ठरले. तसेच २०१६ सालामध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर त्याने तब्बल दोन वर्षानंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकले हे विशेष. केव्हीन अॅण्डरसनच्या रुपात तब्बल ९७ वर्षानंतर दक्षिण आप्रिâकेच्या खेळाडूने विम्बल्डनच्या फायनलपर्यंत मजल मारली होती.
नोवाक जोकोविच व केव्हीन अॅण्डरसन या दोघांनाही उपांत्य फेरीच्या लढतीत कडवा संघर्ष करावा लागला होता. दोघांच्याही फिटनेसचा यावेळी कस लागला होता. पण जेतेपदाच्या लढतीत नोवाक जोकोविचने आपला सर्वोत्तम खेळ करीत केव्हीन अॅण्डरसनला दबावाखाली आणले. नोवाक जोकोविचने पहिले दोन्ही सेट प्रत्येकी ६-२ अशा फरकाने जिंकल्यानंतर तिसर्या सेटमध्ये केव्हीन अॅण्डरसनने त्याला कडवी झुंज दिली. पण टायब्रेकरमध्ये नोवाक जोकोविचने ७-६ अशी बाजी मारली.

























































