शिक्षण पदविका परीक्षा, 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार्‍या प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षेसाठी (डीएलएड) 6 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान ही परीक्षा होणार आहे. जून 2017 व त्यापुढील वर्षात अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 6 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्यापुढे 7 ते 12 ऑक्टोबर विलंब शुल्कासह तसेच 13 ते 18 ऑक्टोबर अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येईल, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.