फ्रिजमध्ये ठेवलेले लिंबू लवकर सुकतात? या सोप्या टिप्स वापरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लिंबू हे स्वयंपाकघरातील अत्यावश्यक फळ मानले जाते. चव वाढवण्यापासून ते आरोग्यदायी पेये तयार करण्यापर्यंत त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र अनेकदा फ्रिजमध्ये ठेवूनही लिंबू लवकर सुकतात, कठीण होतात किंवा त्यातील रस कमी होतो. यामागे चुकीची साठवण हीच मुख्य कारणे असतात. काही सोप्या उपायांचा अवलंब केल्यास लिंबू तीन ते चार आठवडे ताजे ठेवणे शक्य आहे.

 

लिंबाचा वापर करून आपण नानाविध पदार्थ करतो. परंतु हाच लिंबू टिकवण्यासाठी मात्र गृहिणींना नाकीनऊ येते. म्हणूनच लिंबु घरात आणल्यानंतर, तो टिकवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.

 

लिंबू ताजे ठेवण्यासाठी या टिप्स वापरा

धुतल्यानंतर किंवा बाजारातून आणल्यानंतर लिंबावरील ओलावा पूर्णपणे पुसून टाका. ओलसर लिंबांवर बुरशी येण्याचा धोका अधिक असतो.

लिंबू उघडे ठेवण्याऐवजी एअरटाइट डब्यात किंवा झिप-लॉक बॅगमध्ये ठेवल्यास त्यातील ओलावा टिकून राहतो.

फळे-भाज्या ठेवण्यासाठी असलेल्या ड्रॉवरमध्ये लिंबू ठेवणे अधिक योग्य ठरते.

कापलेले लिंबू एअरटाइट डब्यात किंवा प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून ठेवा, त्यामुळे त्यांचा रस टिकून राहतो.

डब्यात किंवा पिशवीत पाणी साचले असल्यास ते त्वरित पुसून टाका.

 

लिंबू किती दिवस ताजे राहतात?

योग्य पद्धतीने साठवलेले अख्खे लिंबू 3 ते 4 आठवडे ताजे राहू शकतात. तर कापलेले लिंबू 3 ते 4 दिवसांच्या आत वापरणे अधिक योग्य ठरते.