
- एका जागेवरून दुसऱ्या जागेवर राहायला गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे गॅस कनेक्शन बदलावे लागते. जर गॅस कनेक्शन बदलायचे असेल तर या गोष्टी फॉलो करा.
- सर्वात आधी ज्या ठिकाणी तुम्ही राहता. म्हणजेच तुमचे सध्याचे गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी तुमच्या सध्याच्या गॅस एजन्सीकडे जा.
- कनेक्शन बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. यामध्ये ओळखीचा पुरावा आणि नवीन पत्त्याचा पुरावा जोडावा लागेल. यानंतर एजन्सी तुम्हाला एक ट्रान्सफर व्हाऊचर देईल.
- सध्याच्या कंपनीकडून तुम्हाला जुना सिलिंडर आणि रेग्युलेटर जमा करण्यास सांगितले जाऊ शकते. तसेच नवीन कनेक्शनसाठी काही शुल्क भरावे लागू शकते.
- जर तुम्हाला एका गॅस कंपनीतून दुसऱया कंपनीत (उदा. इंडेनमधून भारत गॅसमध्ये) कनेक्शन बदलायचे असेल, तर जुने कनेक्शन रद्द करून नवीनसाठी अर्ज करावा लागेल.