रिकाम्या पोटी चहा पिता का? मग ‘हे’ वाचाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चहाप्रेमींना चहाशिवाय काहीच सुचत नाही. बरेच जण तर सकाळी उठल्या उठल्या रिकामी पोटी चहा घेतात. काही जणांना, तर दर तासाला चहा पिण्याची सवय असते. काहींना चहासोबत गरमागरम भजी किंवा बिस्किट, खारी, टोस्ट असे आवडीचे बेकरीतील पदार्थ खायला अतिशय आवडतात, मात्र सकाळी डोळे उघडताच ज्यांना हातात चहा लागतो, त्यांना काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याचा परिणाम पोटावर होतो. त्यामुळे जाणून घेऊया सकाळी चहा प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. विशेषत: उन्हाळ्यात उन्हाळ्यात रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे, अन्यथा त्यात असलेले कॅफिन, अॅलॅन्थाइन आणि थिओफिलिन शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात.

रिकाम्या पोटी दुधासोबत चहा पिऊ नका

अनेकांना दुधाचा चहा जास्त आवडतो, पण तुम्हाला माहित आहे का की तो शरीरासाठी जास्त हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला जास्त चिडचिड आणि अस्वस्थ वाटते. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यास उत्तम.

यकृतावर वाईट परिणाम होतो

चहा प्यायल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने यकृतातील पित्त रस सक्रिय होतो. त्यामुळे चहा प्यायला लागताच तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते.

कमी भूक लागते

दुधाच्या चहाप्रमाणे ब्लॅक टी देखील आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे तुमच्या शरीरात सूज येते.. अधिक ब्लॅक टी प्यायल्याने भूकही कमी होते.

स्ट्रॉंग चहा पिणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही

ज्या लोकांना स्ट्रॉंग चहा प्यायला आवडतो. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, यामुळे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करते. यामुळे पोटात जखमाही होऊ शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास अल्सरही होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चहाचं सेवन करावं पण ते फार कमी प्रमाणात असावं. दिनचर्येनुसार, चहा पिण्याची योग्य वेळ ठरवून त्या वेळी चहा प्यावा.