
देशात सध्याच्या घडीला इंधन आणि गॅस तुटवडा हा विषय अतिशय गंभीर होत आहे. याच विषयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारने राबवलेल्या टीम इंडिया या माॅडेलवर त्यांनी जोरदार टीका केली. सरकारने टीम इंडिया असे ढोंग करण्यापेक्षा परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं असे यावेळी राऊत म्हणाले.
याच मुद्द्यावर अधिक भाष्य करताना राऊत म्हणाले, अनेक राजकीय प्रश्नांवर मोदींनी कधीच देशाला विश्वासात घेतलं नाही. देशावर जे संकट आलेलं आहे त्यावर चर्चा करणं हे गरजेचे होते. टीम इंडिया संदर्भात मोदी गंभीर असतील तर नक्कीच देशातील विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने आहे. अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाने घेतलेली आहे असेही यावेळी राऊत यांनी सांगितले.
टीम इंडिया हे सध्याच्या घडीला पंतप्रधान बोलत आहेत. पण ते कधी राष्ट्रीय विचार करतात का? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला. मूळात त्यांच्या पक्षातील टीम त्यांच्याकडे नाही हम दो हमारे दो अशी त्यांची टीम आहे. संकटकाळामध्ये देश असताना, मतभेद विसरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात आणि यायलाच पाहिजे असे मत यावेळी राऊत यांनी व्यक्त केले.
मोदींच्या टीम इंडिया माॅडेलवर सणकून टीका करताना राऊत म्हणाले, केंद्र सरकारने टीम इंडिया असे ढोंग करण्यापेक्षा परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं. अनेक राजकीय प्रश्नांवर मोदींनी कधीच देशाला विश्वासात घेतलं नाही. देशावर जे संकट आलेलं आहे त्यावर चर्चा करणं गरजेचं होतं. ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केले या माध्यमांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, मोदींनी आजवर केवळ एकच केलं.. ट्रम्पने जे जे सांगितलं ते काम मोदींनी पूर्ण केलं. ट्रम्पने सांगितलं आॅपरेशन सिंदूर बंद करायचं मोदींनी ते करुन दाखवलं.


























































