हे करून पहा – सकाळी उठल्यानंतर डोके दुखते का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांचे डोके दुखते, सुस्तपणा जाणवतो. अनेक जण याकडे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, दुर्लक्ष केल्यास भविष्यात त्रास होण्याची भीती असते. सकाळी सुस्त वाटणे आणि डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.

 ही समस्या टाळण्यासाठी, प्रथम आपल्या झोपेच्या सवयी बदला. साधारणतः 7 ते 8 तासांची पूर्ण झोप घ्या. झोपण्यापूर्वी मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर टाळा.

 दिवसभर भरपूर पाणी प्या. रात्री हलके आणि संतुलित जेवण घ्या. जास्त तेलकट किंवा मसालेदार खाणे टाळा. तसेच तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.