
कुत्र्याने शेजारच्या चार जणांना चावा घेतला. त्यामुळे न्यायालयाने मालकाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. गुजरातमधली ही घटना आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कुत्र्याने शेजारील चार व्यक्तींना चावा घेतला. त्यात तीन लहान मुले आणि अविनाश पटेल यांना चावा घेतला. भरेश पंड्या यांच्या मालकीचा तो कुत्रा असून त्याचे नाव शक्ति आहे. शक्तीने 2012ते 2014 दरम्यान अविनाश पटेल, त्यांचा पुतण्या तक्षिल, आणि इतर दोन मुलांना चावा घेतला. शक्तीने अविनाश पटेल यांना चावा घेतल्याने ते खाली कोसळले आणि त्यांची हाडे तुटली.
या प्रकरणी अविनाश पटेल यांनी तक्रार दाखल केली. न्यायालयाने पंड्या यांना दोषी धरले. दुसर्याचे आयुष्यावर धोका निर्माण करण्यासारखा हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. न्यायालयाने त्यांना एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


























































