काय सांगता… श्वान करतोय सुपरवायझरची नोकरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटवर श्वानांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यात कधी श्वान डान्स करताना दिसतो तर कधी घरातील कामे. पण एखादा श्वान नोकरी करतोय असे तुम्हाला सांगितले तर त्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला थोडे जडच जाईल. कारण एकीकडे कोरोनाच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना प्राण्यांना नोकरी मिळते तर आश्चर्याचा धक्काच बसेल. पण खरंच हैराण करण्यासारखी एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर सध्या एका श्वानाचे आयकार्ड व्हायरल होत आहे. बेगबी असे त्या श्वानाचे नाव असून तो चक्क एका पबमध्ये डोअर सुपरवायझरची नोकरी करतोय. विशेष म्हणजे आपल्या कामाच्या वेळेत तो गळ्यात आयकार्ड घालून आपले कर्तव्य बजावतो. या अनोख्या कर्मचाऱयाला पाहून तिथे येणारी मंडळी आश्चर्यचकित होतेय.