
पशुंनाही मनुष्यप्रमाणे कायदेशीर समानता मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱया याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले. प्राण्यांना माणसाप्रमाणे कायदेशीर मान्यता देणे अशक्य असल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करत याचिका कर्त्यांची मागणी तूर्तास फेटाळून लावली एवढेच नव्हे तर तुमचा कुत्रा तुमच्या बरोबरीचा आहे का असा खोचक सवाल ही याचिकाकर्त्यांना केला.
प्राणी माणसाच्या बरोबरीचे असून त्यांनाही आत्मा आणि बुद्धी असते परंतु माणसाप्रमाणे त्यांची बुद्धी विकसित नाही, प्राणी आणि माणुस समान असून प्राण्यांना देखील माणसाप्रमाणेच कायदेशीर समानता देण्याची मागणी करत एका पशू प्रेमीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्राण्यांना कायदेशीर अधिकार देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे या याचिकेकर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी अशी मागणी मान्य करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले.


























































