गणेशभक्तांशी हस्तांदोलन करणारा गोंडस श्वान! व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका गोंडस श्वानाचा व्हिडीओ चांगलाच भाव खाऊन जातोय. हा श्वान चक्क मंदिरातून बाहेर येणा-या भक्तांना हस्तांदोलन करताना दिसतोय.

नगर जिह्यातील सिद्धटेकच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेरील हा व्हिडिओ आहे. हा श्वान देवळातून बाहेर पडताना असलेल्या पायऱयांजवळ बसलेला असून येणाऱया भक्तांसोबत हस्तांदोलन करताना दिसतोय. भाविकदेखील उत्सुकतेपोटी त्याला शेकहॅंड करताना दिसतायत. अरुण लिमाडिया या एका भाविकाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला अवघ्या दोन दिवसांत 25 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. श्वान प्रामाणिक असतात तसेच गोडही असतात अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर काही युजरने हा गोंडस श्वान पाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या