डोंबिवली फास्ट! स्वच्छतेत टॉप 10 यादीत पटकावला सातवा क्रमांक

975

मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळख असलेली डोंबिवली स्वच्छतेतही फास्ट ठरली आहे. देशभरातील मध्य रेल्वेच्या टॉप टेन स्वच्छ स्थानकांच्या यादीमध्ये डोंबिवलीने सातवा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘

ओसंडून वाहणारी गर्दी आणि लोकल पडकण्यासाठी घडाळ्याच्या काटय़ावर धावणारे प्रवासी… डोंबिवली स्थानकाचे हे चित्र रोजच सकाळ-संध्याकाळ पहायला मिळते. तब्बल 4 लाख प्रवासी संख्या असूनही स्थानक एकदम टापटीप. पुठे कचऱयाची सफाई तर पुठे रंगलेल्या भिंती धुण्याचे काम करणारे 36 कर्मचारी. त्यांचे हे सर्व कष्ट फळाला आले आहे. सप्टेंबर महिन्यात रेल्वे प्रशासनाने खासगी संस्थेद्वारे सरप्राईज ऑडिट केले. ऑडिट करताना रेल्वे स्थानकातील 250 नागरिकांची प्रतिक्रिया ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी बहुतेक प्रवाशांनी स्थानकाच्या स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक ए. के. अब्राहम यांनी दिली.

– डोंबिवली रेल्वे स्थानकाची सफाई करण्याचे पंत्राट एका खासगी संस्थेला देण्यात आले असून 36 कर्मचारी स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.
– डोंबिवली स्थानकाने देशात सातवा क्रमांक पटकावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या