डोंबिवलीत तरुणाची हत्या

जुन्या वादातून तरुणाची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. नरेंद्र जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश बिराजदार याने साथीदारांसह ही हत्या केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत.

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आकाश बिराजदार याने आपल्या साथीदारांसह नरेंद्र जाधव याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात नरेंद्र गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मुख्य आरोपी आकाश बिराजदार व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.