सेफ्टी ऑडिट प्रकरणी डोंबिवली एमआयडीसीतील 38 कंपन्यांवर खटले

458

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक व इतर कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले. कारखान्यात नियमभंग करण्यात आल्याने आतापर्यंत एकूण 38 कंपन्यांविरोधात ठपका ठेवण्यात आला असून या कंपन्यांविरोधात ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी आज विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली. डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळामध्ये सुरक्षेच्या परीक्षणाशिवाय कारखाने सुरू असल्याबाबत आमदार कुमार आयलानी, प्रमोद पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या