
छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला विरोध केल्याने डोंबिवलीत एका टोळक्याने 25 वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाहीतर मुलीच्या मदतीला धावून आलेल्या तिच्या दोन मित्रांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे.
छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला विरोध केल्याने डोंबिवलीत एका टोळक्याने 25 वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाहीतर मुलीच्या मदतीला धावून आलेल्या तिच्या दोन मित्रांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. pic.twitter.com/nOLDJfj9qj
— Saamana (@SaamanaOnline) July 5, 2021
याविरोधात शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक विजया पोटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडक दिल्यानंतर 12 तासांत 9 आरोपींना अटक केली आहे. तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीसाठी रिक्षा पकडली होती. रिक्षात सदर मुलगी आपल्या फोनवर बोलत असताना रिक्षाचालकाने तिची छेड काढत मोबाईल नंबर मागू लागला. अखेर मुलीने रिक्षा थांबवण्यास सांगितले अन्यथा रिक्षातून उडी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या रिक्षाचालकाने आपली रिक्षा काटेमानिवली येथे थांबवून मुलीच्या कानशिलात लगावली. घाबरलेल्या तरुणीने तिचे दोन मित्र बंटी प्रधान व राहुल गडेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा रिक्षाचालकाने आपल्या आठ साथीदारांना बोलावून या तरुणीवर हल्ला केला.



























































