
ओव्हरपॅक लोकलमधून प्रवासी पडण्याच्या घटनांची मालिका डोंबिवलीत सुरूच आहे. आज सकाळी 9.30 च्या सुमारास पांडुरंग गुरव हा 31 वर्षीय तरुण कोपर स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडला. सुदैवाने यात त्याचे प्राण वाचले. धक्कादायक म्हणजे जखमी अवस्थेत विव्हळत असताना त्याने स्वतःच या अपघाताची माहिती आपल्या भावाला मोबाईलवरून दिली. त्यामुळे तातडीने मदतकार्य करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशाल याच्या डोक्याला व डाव्या खांद्याला जखम झाली होती. त्यामुळे सर्वप्रथम त्याला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला ठाणे रुग्णालयात हलवण्यात आल्याचे शास्त्रीनगर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांनी सांगितले.






























































