वीज बिल माफीसाठी घरगुती ग्राहकांचे आज धरणे आंदोलन

579

राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी उद्या सोमवारी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करून निवेदन दिले जाणार आहे.

घरगुती वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील वीज बिलात 20-30 टक्के सवलत देण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. मात्र सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना आजही लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनमधील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, त्याचा भार सरकारने उचलावा अशी मागणी वीज ग्राहक संघटनेने केली आहे. त्यासाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी सांगितले. तसेच 15 ऑगस्ट रोजी होणाऱया ग्राम सभेत सर्व ग्रामपंचायतींनी वीज बिल माफीचा ठराव करून त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवावी असेही आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या