
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन पुनर्रचना योजनेअंतर्गत आज तब्बल 1 हजार 300हून अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याची घोषणा केली. आतापर्यंत 1 हजार 107 सिव्हील सर्व्हंट्स आणि 246 परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांना नोकरीतून काढण्याबाबतच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत.
परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांना 120 दिवसांच्या प्रशासकीय सुट्टीवर पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची नोकरीच संपुष्टात येणार आहे. तर सिव्हील सर्व्हंट्ससाठी हाच कालावधी 60 दिवसांचा असणार आहे.