संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर केला ‘हा’ रेकॉर्ड

796

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या संभाव्य कारवाईमुळे अडचणीत आले आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सातत्याने त्यांना टीकेचे लक्ष्य करत आहे. महाभियोगाची कारवाई आणि विरोधी पक्षांच्या टीकेमुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी ट्विटरवर एक वेगळाच रेकॉर्ड बनवला आहे. त्यांनी दोन तासात तब्बल 123 ट्विट करत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

आपल्याविरोधात महाभियोगाच्या आरोपांच्या चौकशी सुरू करण्याच्या संसदेच्या विधीसमितीच्या निर्णयाविरोधात त्यांनी दोन तासात 123 ट्विट केले. विधासमितीच्या निर्णयामुळे ट्रम्प नाराज झाले असून संतापाच्या भरात त्यांनी 123 ट्विट करत विरोधी पक्षांवरील आपला राग ट्विटमधून व्यक्त केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटवरून ते खूप नाराज आणि संतापलेले वाटत असून त्यांनी मनातील रागाला ट्विटरवर वाट मोकळी करून दिली. हाऊस ऑफ रिप्रेजेटेटिव्हमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग लागू करण्यासाठी आरोप निश्चितीसाठी मतदान घेण्यात आले. त्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरवरून विरोधकांवर हल्ला चढवला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये प्रसारमाध्यमांवरही टीका केली आहे. दोन तासात ट्विट आणि रिट्विट करत त्यांनी याआधीचे रेकॉर्ड मोडीत काढले. आपण काहीही अयोग्य केले नसून आपल्याविरोधात महाभियोग आणला जात आहे. यामुळे आपल्या देशाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या