डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुत्राची नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानीवर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी न्यूयॉर्क सिटीचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांच्यावर टीका केली आहे. ममदानी हे डाव्या विचारांवर चालणारी व्यक्ती असून त्यांच्या विचारधारेमुळे न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहराला नुकसान पोहोचू शकते. ममदानी हे सोशलिस्ट…कम्युनिस्ट…आहेत. त्यांना किराणा स्टोअर्सचे राष्ट्रीयीकरण करायचे आहे, नेतान्याहू यांना अटक करायचे आहे. ते यहुदी समाजाचा आणि हिंदुस्थानी लोकांचा द्वेष करतात, असे एरिक ट्रम्प म्हणाले. न्यूयॉर्क जगातील सर्वात सुंदर शहर होते, परंतु या शहराची चमक आता कमी होत आहे, असेही ते म्हणाले.