
मेटा आणि राष्ट्रीय महिला आयोगाने फरहान अख्तर यांची संस्था मर्दसोबत सहयोगाने महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी तक्रार मोहीम ‘घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित रहा’ घोषणा केली. ही मोहीम ऑनलाइन छळ, अयोग्य साहित्य किंवा वर्तणूक यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी उपलब्ध साधने आणि स्त्रोत यांच्याबाबत जागरूकता आणि ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. इंग्रजीसह पाच हिंदुस्थानी भाषा – हिंदी, बंगाली, मराठी, कन्नड आणि तमीळ भाषेतून ही मोहीम सुरू होणार आहे. वापरकर्त्यांसाठी सुरक्षित इंटरनेट निर्माण करण्याचे प्रयत्न आणि उपक्रम यांच्याबाबत फेसबुक इंडिया (मेटा)च्या धोरण उपक्रम आणि आऊटरीचच्या प्रमुख मधू सिंग सिरोही यांनी मार्गदर्शन केले.




























































