सहव्याधीग्रस्तांना बूस्टर डोसची गरज, डॉ. अविनाश फडके यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

पूर्वी झालेला कोरोना आणि दोन डोस घेतलेल्या ‘लसवंतां’च्या शरीरात ऑण्टिबॉडीजचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे अशा लसवंतांनी सध्या तरी बूस्टर डोसची चिंता करू नये, पण सहव्याधी असलेल्यांनी दोन डोस घेतले तरी सहा ते नऊ महिन्यांनी त्यांच्या शरीरातील ऑण्टिबॉडीजचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सहव्याधी असलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस घेण्याची गरज भासू शकते, असे मत ‘एसआरएल डायग्नोस्टिक’चे अध्यक्ष डॉ. अविनाश फडके यांनी व्यक्त केले.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही पुन्हा तिसरा डोस घेण्याच्या गरजेविषयी वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. लस डोस घेतल्यावर काही महिन्यांनी शरीरातील ऑण्टिबॉडीज कमी होतात. त्यामुळे तिसऱया बुस्टर डोसची गरज आहे,असे सांगण्यात येते. खास करून सहव्याधी असलेल्यांनी दुसऱया डोसनंतर शरिरातील ऑण्टिबॉडीजची चाचणी करावी असेही सांगण्यात येते. पण अनेकांना ऑण्टिबॉडीज किती प्रकारच्या असतात, चाचणी कधी करावी, असे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात.

ऑण्टिबॉडीज दोन प्रकारच्या

स्पाईक प्रोटीन ऑण्टिबॉडीज व न्युक्लिओपॅप्सिड ऑण्टिबॉडीज असे दोन प्रकार असतात. स्पाईक प्रोटीन ऑण्टिबॉडीज टेस्ट आणि न्युक्लिओपॅप्सिड ऑण्टिबॉडीज या दोन्ही चाचण्यांचे अहवाल वेगळे येतात.

ऑण्टिबॉडीज टेस्ट कोणी करावी…

सरसकट सर्वांनी ऑण्टिबॉडीज टेस्ट करण्याची गरज नाही. पण ज्येष्ठ नागरिक, पॅन्सर, किमोथेरेपीचे रुग्ण, स्टेराईड घेणारे, डायलिसिसवरच्या व्यक्ती, मधुमेही, सहव्याधी असलेल्यांनी ऑण्टिबॉडीज टेस्ट करण्याची गरज असते.

…म्हणून पुन्हा कोरोनाचा संसर्ग

ज्यांनी लसीचे दोन दोन डोस घेतले, पण पूर्वी कधी कोरोना झाला नाही त्यांच्यात सहा महिन्यांनी ऑण्टिबॉडीजचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. नऊ महिन्यांनी ऑण्टिबॉडीजचे प्रमाण खूपच कमी होते. म्हणूनच दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोना झाला आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या डॉक्टरांनाही कोरोना झाल्याची उदाहरणे आहेत.

सहव्याधी असलेल्यांसाठी

सहव्याधी असलेल्या लोकांनी दुसरा डोस घेतल्यावर पंधरा दिवसांनी स्पाईक प्रोटीन ऑण्टिबॉडीज टेस्ट करायला पाहिजे.