डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करा, शिक्षण संचालनालयाच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विविध कार्यक्रम आयोजित करावे, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने जारी केल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळांनी या कार्यक्रमाचे नियोजन करावे असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक कार्याची महती विद्यार्थ्यां पर्यंत पोहचावी यासाठी, राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्याच्या सूचना काढण्यात आल्या आहेत.

पण शाळा, महाविद्यालये बंद असताना हे कार्यक्रम कसे पार पाडायचे असा प्रश्न मुख्याध्यापक, शिक्षकांनी उपस्थित केला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, एकपात्री अभिनय, व्हिडीओ निर्मिती एकांकिका, कथाकथन, निबंध लेखन स्पर्धा तसेच दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह, वक्तृत्व, काव्यवाचन यासारखे कार्यक्रम स्तरनिहाय , गटनिहाय राबविवले जाणार आहेत तसेच शिक्षण विभागाकडून आंबेडकर जयंती 2021, वर व्हिडीओ व साहित्य उपलोड कारणाचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय विविध समाज माध्यमावर (फेसबुक, इंस्टाग्राम, द्वीटर) अपलोड करावेत. यासाठी शिक्षक व पालकांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.