डॉ. नेनेंनी खाल्ली हिरवी मिरची, माधुरीला बसला धक्का!

आपल्या अभिनय आणि नृत्याने सगळ्यांची मने जिंकणारी धक धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या यूटय़ूब चॅनलवरून नवनवीन रेसिपीज शेयर करते. उकडीचे मोदक, साबुदाणा खिचडीनंतर आता माधुरीने कांदेपोह्याची रेसिपी चाहत्यांसाठी शेयर करणार आहे.

नुकताच या व्हिडिओचा टीझर तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. गंमत म्हणजे या टीझरच्या सुरुवातीला माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने तिला अख्खी हिरवी मिरची खावून दाखवत आहेत. हे पाहून माधुरीला धक्का बसल्याचे दिसत आहे. याशिवाय ते माधुरीला कांदेपोहे बनवण्यासाठी मदत करताना दिसत आहे. या रेसिपीसोबत दोघांनी मराठीत कांदेपोहे आपल्यासाठी किती स्पेशल आहेत याची गोड आठवणदेखील सांगितली आहे. कांदेपोहे माझ्या आजीला फार आवडायचे आणि आम्ही नाश्त्याला अनेकदा बनवायचो, असे श्रीराम नेनेंनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या