
फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोरील कार्यालयावर आज निषेध मोर्चा काढण्यात आला. ‘रूपाली चाकणकर राजीनामा द्या’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांना आवरताना पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत आघाडीच्या प्रवक्ता उत्कर्षा रुपवते, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी व अन्य काही महिला आंदोलक जखमी झाल्या. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


























































