‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 92 वर्षाचे होते.

डॉ. श्रीराम लागू यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अभिनेत्री दिपा श्रीराम आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा तन्वीर याचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ लागू दाम्पत्य ‘तन्वीर सन्मान सोहळा’ आयोजित करत होते.

डॉ. श्रीराम लागू हे कान, नाक, घसा तज्ज्ञ होते. त्यांनी काही काळ आफ्रिकेमध्येही प्रॅक्टिस केली होती. त्यांचे ‘लमाण’ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘पिंजरा’मधील मास्तर, सिंहासनमधील कामगार नेता, ‘सामना’मधील मास्तर या त्यांच्या अजरामर भूमिका आहेत. तसेच ‘नटसम्राट’ नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका देखील प्रचंड गाजली.

लागू यांचे मराठी चित्रपट –
पिंजरा, सामना, गुपचूप गुपचूप, कामापुरता मामा, झाकोळ आणि सिंहासन

लागू यांची गाजलेली नाटकं –
नटसम्राट, पप्पा सांगा कोणाचे, प्रेमाची गोष्ट, सुंदर मी होणार,  हिमालयाची सावली, किरवंतआणि इथे ओशाळला मृत्यू

हिंदी चित्रपट –
घरौंदा, हेराफेरी, बारूद, चलते चलते, अगर, फुल खिले गुलशन गुलशन, अंजाम

पुरस्कार – 
– 1978 साली आलेल्या घरौंदा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड
– 1997 साली कालिदास सन्मान
– 2006 साली नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृति पुरस्कार
– 2007 साली पुण्यभूषण पुरस्कार
– 2010 साली संगित नाटक अकादमीची फेलोशिप