12 दिवसात पूर्ण केला कन्याकुमारी ते कश्मीर प्रवास, डॉ.तुषार यांचे परळीत जंगी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी येथील सुपरिचित डॉक्टर म्हणून ओळख असलेले तुषार पिंपळे यांनी आपल्या मोटर सायकलवरून केवळ 12 दिवसात 7000 किलोमीटर प्रवास पूर्ण करून कन्याकुमारी ते रोहतांग पास अटल टनेल असा हिंदुस्थान भ्रमण करण्याचा विक्रम केला आहे. तेआज परळीत परतले आहेत. दि. 18 नोव्हेंबरला परळीतून प्रवासासाठी ते निघाले होते. प्रवास करून परळीत परतल्यानंतर आज डॉ. पिंपळे यांचे कुटुंब व मित्र परिवाराने त्यांचे जंगी स्वागत केले.

कोरोनाच्या भीतीने एकीकडे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत, अशा काळात हौशी बाईक रायडर असलेल्या डॉ. तुषार यांनी देश पालथा घालण्याचे ते आव्हान स्वीकारत आपल्या हरली डेव्हीडसन ( HARLEY DAVIDSON FAT BOB..) 1600cc या आवडत्या बाईक वरून हे भारत भ्रमण पूर्ण केले आहे.डॉ. तुषार पिंपळे यांनी दररोज साधारण ८०० किलोमीटर इतका प्रवास केला.

18 तारखेला परळी येथून निघून, बीड, सोलापूर, बेंगलोर, कन्याकुमारी परत बेंगलोर, हैद्राबाद, नागपूर, आग्रा, ग्वाल्हेर, चंदिगढ, मनाली, रोहतांग, अटल टनेल, परत चंदिगढ, जयपूर, इंदोर, धुळे, संभाजीनगर आणि शेवटी आज परत परळी असा 12 दिवस प्रवास करत डॉ. पिंपळे यांनी देश भ्रमण पूर्ण केले. आपला छंद जोपासण्यासाठी ते नेहमी विविध बाईक स्पर्धा, बाईक सफर आदींमध्ये सहभागी होत असतात.आज त्यांच्या स्वागतावेळी प्रशांत जोशी, डॉ श्रीगोपाल झंवर, डॉ अशोक लोढा,मुकेश काबरा यांच्या सह मित्रपरिवार उपस्थित होता.