मोनो आणि मेट्रोमुळे मुंबईतील ड्रेनेज पाईप फुटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या विविध भागांत सुरू असलेल्या मोनो-मेट्रोच्या कामामुळे पालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्या फुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. या मलनिस्सारण वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. शिवाय अनेक ठिकाणी घाणेरडे पाणी रस्ते-वस्तीत शिरल्याने रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्याजवळील रहिवाशांच्या घरांत दूषित पाणी शिरल्याने त्यांना घर सोडावे लागले आहे. मेट्रो व मोनो रेल्वेच्या कामांतर्गत पालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्या फुटल्याच्या घटना मालाड व करी रोड या ठिकाणी घडल्या आहेत.

अशी होणार दुरुस्ती

  • करी रोड येथे पालिकेला 800मि.मी. व्यासाची मलनिस्सारण वाहिनी आणि मालाड येथे 1200 मि.मी. व्यासाची मलनिस्सारण वाहिनी सूक्ष्म बोगदा पद्धतीची टाकावी लागणार आहे.
  • अंधेरी, चेंबूर, दहिसर, कांदिकली या ठिकाणीही मलनिस्सारण काहिन्यांची कामे करण्यात येणार असून त्यासाठी पालिकेला एकूण 73 कोटी 98 लाख  रुपयांचा खर्च येणार आहे.
  • काही कोटींची रक्कम या मेट्रो क मोनो रेल्वेमुळे फुटलेल्या मलनिस्सारण काहिन्यांच्या कामांकर खर्च होईल.

जोगेश्वरीतील तीन कुटुंबियांचे स्थलांतर

आठपैकी तीन कुटुंबांना दुसरीकडे घर भाडय़ाने घेऊन राहण्याची वेळ आल्याचे शिवसेना नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी आज सुधार समितीत स्पष्ट केले. या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण न देता निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करून या रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याने आम्हाला राहते घर सोडून भाडयाने राहावे लागत  आहे. – विष्णू मालणकर (75)

अतिवृष्टी होऊनही कधी त्रास झाला नव्हता, मात्र आता थोडा पाऊस झाला तरी घरात पाणी शिरते. – चंद्रशेखर मालणवर (65)