‘रंगवैखरी’ स्पर्धेचा नाट्यजल्लोष रविवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य मराठी विकास संस्था आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा ‘रंगवैखरी’ची महाअंतिम फेरी येत्या रविवारी 6 जानेवारीला प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात रंगणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणारा हा नाट्यजल्लोष प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. आपल्या मनातील विचार, कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकांना, कवींना साहित्याच्या-भाषेच्या मांडणीत बदल करणे अनिवार्य वाटू लागते. मराठी साहित्यातही मानदंड म्हणून नावाजलेले निवडक सतरा कवी आणि कादंबरीकार राज्य मराठी विकास संस्थेने निवडले. त्यांपैकी कोणत्याही एका कवीच्या किंवा कादंबरीकाराच्या साहित्यावर आधारित सादरीकरणासाठी ‘नव्या वाटा’ हा विषय देण्यात आला होता.