स्कायवॉक से गिरे, केबलपर अटके

721

‘फुल्ल टू टाईट’ अवस्थेतील दारुडा स्कायवॉककरून पडून थेट केबल वायरवर अडकल्याचा विचित्र प्रकार डोंबिवलीत समोर आला. या दारुड्याच्या करामती पाहून प्रत्यक्षदर्शनी घटनास्थळी एकच गर्दी केली. सुदैवाने या घटनेत त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय या घटनेतून आला.

डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉककर आज सकाळी पादचाऱ्यांची वर्दळ असतानाच एक मद्यधुंद पादचारी खाली कोसळला. मात्र स्कायवॉकच्या खाली असलेल्या केबल वायरमध्ये तो अडकून पडला. त्याला वाचवण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. स्कायवॉकवरून खाली पडल्याने भानावर आलेल्या या दारुड्याने केबल वायरचा आधार घेतला. या केबलला धरून तो खाली उतरला. स्कायवॉकवर फेरीवाल्यांची गर्दी असल्याने हा पादचारी खाली पडला. तर पूर्वेला असलेल्या लिफ्टजवळ पुलावरील लोखंडी बार काही ठिकाणी तुटले आहेत. त्या गॅपमधून तो खाली पडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. त्याची ओळख पटलेली नसून या घटनेने स्कायवॉकवरील फेरीवाले क पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या