बाळासाहेब ठाकरे चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, 92 हजार विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला कोरोना काळातही 92 हजार 372 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 10 जानेवारीला ऑनलाईन झालेल्या ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचा निकाल आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

चार गटांतील विजेते 

गट 1 – प्रथम क्रमांक – साफीया खान, अलफलाह प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक – ब्रम्हेश मगदूम, उत्कर्ष विद्यामंदिर मालाड, तृतीय क्रमांक – सुफियान मुल्ला, लव ग्रोव पंपिंग एम. पी. एस.,  गट 2- प्रथम क्रमांक – वेदांत कांबळे, न्यू मोदी स्ट्रीट. मनपा इंग्रजी शाळा, द्वितीय क्रमांक – सोहम तुळसकर, अभ्युदय एज्युकेशन सोसायटी, इंग्रजी शाळा, तृतीय क्रमांक – हार्दिक दोरनाल, अँटनिया डिसिल्वा हायस्पूल.  गट 3  – प्रथम क्रमांक – अनुष्का गुप्ता, नारियालवडी मनपा हिंदी शाळा, द्वितीय क्रमांक – निमिशा भाटकर, सेंट जोसेफ हायस्पूल, तृतीय क्रमांक – आनिक शेख, मायकेल हायस्पूल-पुर्ला. गट 4  – प्रथम क्रमांक – युवराज कसारा, कल्लेक्टर का@लनी, मनपा, हिंदी सेपंडरी शाळा, द्वितीय क्रमांक – आदित्य यादव, मालती जयंत दलाल हायस्पूल, तृतीय क्रमांक – पुणाल मुळे, पेंद्रीय विद्यालय.

आपली प्रतिक्रिया द्या