डीआरडीओने विकसित केली जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ, 48 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची क्षमता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्कराने जगातील सर्वेत्तम अशी एटीएजीएस ‘हॉवित्झर’ तोफ स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केली आहे. दूरवरच्या 48 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे असे संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या वैज्ञानिकाने म्हटले आहे.

‘चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणीदरम्यान हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस् फायर करण्यात आल्या आहेत’ असे फिल्ड चाचणीदरम्यान ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना एटीएजीएस ‘हॉवित्झर’ तोफ प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही. गाडे यांनी सांगितले.

तोफा आयातीची गरज नाही

‘स्वदेशी बनावटीची ही तोफ हिंदुस्थानी लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते. या क्षेत्रात आयातीची आवश्यकता नाही’ असे गाडे यांनी सांगितले.‘हिंदुस्थानी लष्करात वापरात असलेली बोपर्ह्स आणि इस्रायलने जी ‘एटीएचओएस’ तोफ देण्याची तयारी दाखवली आहे. त्यापेक्षा स्वदेशी हॉवित्झरमधील सिस्टम अधिक चांगली आहे’ असे गाडे म्हणाले.