नगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये दोन महिन्याच्या आत लागू होणार ड्रेस कोड

उद्या पासून आणि नगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये दोन महिन्याच्या आत ड्रेस कोड लागू होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

नगर शहरातील नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर बुरानगर ,श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा, शनि मारुती मंदिर दिल्ली गेट, शनि मारुती मंदिर झेंडीगेट,तुळजाभवानी माता मंदिर सबजेल चौक,श्री गणेश राधा कृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर पवन नगर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वणी नगर, या मंदिरांमध्ये उद्या पासून आणि नगर जिल्ह्यातील मंदिरा मध्ये दोन महिन्याच्या आत ड्रेस कोड लागू होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे.

यावेळी अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, अभिषेक भगत, मिलिंद चावंडके, रामेश्वर भुकन हभप भोंग ताई आदी उपस्थित होते.

ड्रेस कोड लागू झालेले मंदिर

श्री भवानी माता मंदिर बुहानगर
श्री शनि मारुती मंदिर दिल्ली गेट
श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा वेस
श्री शनि मारुती मंदिर झेंडी गेट
श्री गणेश राधाकृष्ण मंदिर मार्केट यार्ड
श्री विठ्ठल मंदिर पाईप लाईन रोड
श्री दत्त मंदिर पाईप लाईन रोड
श्रीराम मंदिर पवन नगर सावेडी
श्री भवानी माता मंदिर सब जेल चौक
श्री रेणुका माता मंदिर केडगाव
श्रीराम मंदिर वडगाव गुप्ता
श्री पावन हनुमान मंदिर वडगाव गुप्ता
श्री संत बाबाजी बाबा मंदिर वडगाव गुप्ता
श्री साईबाबा मंदिर केडगाव
श्री खाकीदास बाबा मंदिर