वाहन चालवताना ब्रेक निकामी झाल्यास काय करावे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रायव्हिंग करताना वाहनाचे ब्रेक निकामी झाले, तर हे खूपच धोकादायक ठरू शकते. असा प्रसंग आल्यास काय करावे? याबाबतच आज आम्ही तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगणार आहोत. जेणेकरून अशा परिस्थितीस तुम्ही स्वतःस तयार कराल.

घाबरू नका

अशा परिस्थितीत घाबरल्यास आपल्याकडून चुका होऊ शकतात. म्हणून शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण हीच गोष्ट आपल्याला खूप उपयोगी पडते. शांत डोक्याने गाडी रस्त्याच्या कडेला कशी नेहता येईल यासाठी प्रयत्न करा.

पुन्हा ब्रेक वापरुन पहा

जुनी वाहने सोडल्यास, आता नवीन वाहनांमध्ये ड्युअल ब्रेकिंग सिस्टिम असते. जी आपल्या पुढचे आणि मागील ब्रेक स्वतंत्रपणे नियंत्रण करते. तरीही आपल्या गाडीची ब्रेकिंग पॉवर अर्ध्याने कमी झाल्याने ती असुरक्षित आहे, हे वाटणे साहजिकच आहे. मात्र त्यात अजून ब्रेकिंगची पॉवर असू शकते. आपण गाडी थांबवण्यासाठी ब्रेक लागेल तोवर सतत दाबण्याचा प्रयत्न करावा.

आपत्कालीन ब्रेक काळजीपूर्वक वापरा

आपली मुख्य ब्रेकिंग सिस्टम कार्य करत नसल्यास आपत्कालीन ब्रेक काळजीपूर्वक वापर करणे, हा एक पर्याय आहे. हा पर्याय हायड्रॉलिक ब्रेक सिस्टमपेक्षा वेगळा आहे आणि यामुळे वाहन थांबविण्यात मदत होऊ शकते. परंतु हा पर्याय फक्त तुमची स्पीड कमी असताना उपयोगी येऊ शकतो. तुमच्या गाडीची स्पीड जास्त असल्यास अचानक हे ब्रेक दाबलायस मोठा अपघात होऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवावे. जर स्पीड कमी असेल तरच याचा वापर करावा.

लोअर गिअरमध्ये डाउनशिफ्ट

आपली गाडी थांबवण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, आपला पाय हा एक्सिलेटरपासून दूर ठेवावा. गाडीचे गिअर डाउन शिफ्ट करावे, जेणेकरून गाडीची स्पीड कमी होईल. आपल्याकडे ऑटो गिअर ट्रान्समिशन असल्यास, आपला पाय एक्सिलेटरवरून काढल्यास गाडी आपोआप कमी गिअरमध्ये शिफ्ट होते.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत जाधव यांनी ही माहिती दिली.