रक्त व लसींचा साठा घेऊन राज्यात ड्रोनची गगनभरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drone-medicine

राज्यात खासकरून दुर्गम भागात तातडीने रक्त व जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर करण्याचा राज्यातील कदाचित देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. नंदुरबार व पुणे जिह्यात दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार असून ही योजना यशस्वी झाल्यास राज्याच्या इतर भागांत ड्रोनचा वापर करण्यात येईल.

वैद्यकीय उपचारांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सध्या येतो. अवयवदान चळवळ फोफावल्यामुळे हृदय तसेच किडनी व इतर अवयवांचे तातडीने प्रत्यारोपण करण्यासाठी ऍम्ब्युलन्ससाठी ग्रीन कॉरीडॉर तयार करण्यात येतो. गडचिरोली जिह्यात काही ठिकाणी वॉटर ऍम्ब्युलन्सचा प्रयोग राबविण्यात आला आहे.

झिपलाइनशी करार

या योजनेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने झिपलाइन इंटरनॅशनल इन्कॉर्पोरेशन या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. ही योजना दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या योजनेसाठी राज्य सरकार झिपलाइन कंपनीला कोणताही निधी देणार नाही. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यास राज्य सरकारवर कोणतीही जबाबदारी राहणार नाही असे करारात नमूद केले आहे.