
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेनेच्या दणक्याने राज्य सरकार ताळय़ावर आले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येईल आणि पाहणीनंतरच दुष्काळ जाहीर होऊन केंद्राची मदत मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. आजही शिवसेनेने रुद्रावतार धारण केला. शिवसेना पक्षप्रमुख यांनी राज्यात दुष्काळी स्थिती असून केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱयांना तत्काळ मदत करा, असे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात बजावले होते. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याची कबुली दिली.


























































